दिवाळी निमित्ताने सेवेकरी आणि गोरगरीब भक्तांना दिवाळी कीटचे वाटप -श्री शनेशवर देवस्थान ट्रस्ट सोळशी यांचा सामाजिक उपक्रम
डॉ. संदीप डाकवे यांना कलाम राष्ट्र उभारणी प्रेरणा पुरस्कार प्रदान

स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत असल्याबद्दल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष डॉ.संदीप डाकवे यांना जिल्हास्तरीय डॉ. कलाम राष्ट्र उभारणी प्रेरणा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ड्रीम फाउंडेशन व चाणक्य गुरुकुल अकॅडमीतर्फे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम जयंती औचित्याने पुणे येथील पत्रकार भवनमध्ये डॉ. कलाम राष्ट्र उभारणी प्रेरणा पुरस्कार वितरण व भारतीय स्वातंत्र्य अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित व्याख्यानमाला अंतर्गत मार्गदर्शन प्रसंगी ते बोलत होते. समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या युवा कार्यकर्त्यांचा गौरव हा युवकांना प्रेरणादायी ठरेल व समाजाला दिशा देण्यासाठी कार्यरत लोकांना मार्गदर्शन ठरेल, असे मत अप्पर पोलीस महासंचालक, महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवेचे अधिकारी अतुलचंद्र कुलकर्णी यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमात डॉ.सुधा कांकरिया, लेखक विठ्ठल क्षीरसागर, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत डीसले, श्रीकांत साबळे, डॉ. प्रशांत नाईकवाडे, दीपक होमकर, अजिंक्य पाठक, शिरीषकुमार मजगे, डॉ.चंद्रकांत फाळके, रूपेश पाटील, रेणुका हिरेमठ, प्रा. डॉ. सुभाष गायकवाड, सतीश वाघ यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. डॉ. कलाम यांचे स्वप्न साकार करण्यासाठी युवा प्रेरणा व सामाजिक, शैक्षणिक, महिला जागर कार्य करणे गरजेचे आहे. समाजातील वंचित घटकासाठी, लेक लाडकी अभियानासाठी कार्य करणाऱ्या सुधा कांकरिया यांचे कार्य मोठे आहे. यातून प्रत्येकांनी प्रेरणा घ्यावी असं यावेळी कुलकर्मी यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राम जवान यांनी केले तर आभार संगीता भतगुणकी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सतीश पाटील, नागेश श्रीचिपा, शेखर पाटील यांनी परिश्रम घेतले. यावेळी यशदाचे उपमहासंचालक डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, ड्रीम फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष काशिनाथ भतगुणकी, कृशी सहसंचालक बसवराज बिराजदार, उद्योजक हरीश पुजारी, कुमार दादा करजगी, शिवाजी चमकिरे, संजय लाड, रवींद्र टापरे, डॉ.सचिन मांजरेकर, सचिन जाधवर, शंकरराव अक्कलकोटे, अमोल उंबरजे आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. गेल ऑम्व्हेट यांचे दुःख निधन....

आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या समाज शास्त्रज्ञ, डॉ.भारत पाटणकर यांच्या पत्नी. श्रमिक मुक्ती दलाच्या संस्थापक सदस्या व धोरण समितीच्या सदस्या, बुद्ध, फुले, आंबेडकर, मार्क्स यांच्या व स्त्री-मुक्तीवादी विचारांची, संत साहित्याची आणि वारकरी तत्वज्ञानाची अभ्यासपूर्ण अशी नव्या पद्धतीची मांडणी करून समाजापुढे आणणाऱ्या जेष्ठ संशोधक -लेखिका, स्त्री मुक्ती चळवळ आणि परित्यक्ता स्त्रियांची चळवळ, आदिवासी चळवळी मध्ये पायाला भिंगरी लावून झपाटल्या सारखे काम करणाऱ्या विचारवंत कार्यकर्त्या गेल ऑम्व्हेट यांचे वयाच्या ८१ व्या वर्षी वृद्धापकाळाने दुःख निधन झाले.
भारत फोर्ज कंपनीने सातारा जिल्ह्यातील २४ गावांना केले कोरोना लढ्यासाठी विविध साधनांचे वाटप...
साताऱ्यात पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते शासकीय झेंडावंदनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न
व्यसनमुक्त युवक संघाचे शिलेदारांनी गुरूवर्य बंडातात्यांबरोबर कळसुबाई शिखर केले सर

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात असणारे महाराष्ट्रातील सर्वात ऊंच कळसुबाई शिखर व्यसनमुक्त युवक संघाच्या शिलेदारांनी भल्या पहाटे सर करुन एक आगळी वेगळी मोहीम यशस्वी केली. व्यसनमुक्त युवक संघाचे संस्थापक युवकमित्र संतवीर ह.भ.प. बंडातात्या कऱ्हाडकर हे नेहमी अशा पद्धतीच्या धाडसी मोहीमा राबवित यशस्वी करीत असतात. ऐन दिवाळीच्या सणात महाराष्ट्रातील बंद असलेली मंदिरे खुली करण्यासाठी त्यांनी महाराष्ट्र सरकारवर सडकून टिका करीत दिपावाळीच्या पहिल्या स्नानाच्या दिवशी शिमगा करुन शासनाच्या मंदिर बंद कृतीचा निषेध केला होता. त्याच दिवशी सरकारने मंदिरे व प्रार्थना स्थळे खुली करुन सर्व जनतेची दीपावली गोड केली होती, त्यावेळी सर्वात अगोदर ह. भ. प. बंडातात्या कऱ्हाडकर यांनी शासनाचे व मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले होते. सतत समाजाला प्रेरणा देणारे नवीन उपक्रम ते राबवीत असतात. दिपावाळीच्या सणात त्यांनी कळसूबाई शिखर सर, करण्याची मोहीम आखली आणि दि. १९ नोव्हेंबर रोजी भल्या पहाटे व्यसनमुक्त युवक संघाच्या शिलेदारांना समवेत घेऊन त्यांनी ते सरही केले. या मोहिमेत महाराष्ट्रातील सातारा, सोलापूर, पुणे, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर, नाशिक, अकोला या जिल्ह्यातील युवकांनी दि.१८ रोजी पूर्व संध्येला मुक्कामी चितळवेढे, ता.अकोले या गावी संघाचे शिलेदार माऊली आरोटे यांच्याकडे जाऊन दि. १९ च्या गुलाबी थंडीत शिखर चढायला सुरुवात केली सुरुवातीचा शिलेलार १ तास २२ मिनिटांनी शिखरावर पोहोचला, त्या पाठोपाठ इतरही पोहचले या भागातील निसर्गाचे अप्रतिम रुप, पाखरांचा किलबिलाट पूर्व दिशेने उगवणारे सूर्याचे प्रतिबिब सर्व काही विलोभनीय नजारा सर्वांना अनुभवायला मिळाला. अशा अनेक मोहिमा व्यसनमुक्त युवक संघाच्या माध्यमातून राबविल्या जातात. आग्रा ते राजगड हा सुमारे १३०० कि. मी. चा पायी प्रवास, पन्हाळगड ते विशाळगड, पुरंदर ते वढू तुळापूर, संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी ते वढू तुळापूर पायी मोहीम करुन छत्रपती श्री शिवाजी महाराज व छत्रपती श्री संभाजी महाराज यांचा इतिहास युवकांनी जगला पाहिजे यासाठी ते प्रयत्नशील असतात. ज्या राष्ट्रासाठी छत्रपतींनी आपले आयुष्य खर्ची घातले तो इतिहास आपण पाहिलाच पाहिजे, छत्रपतींचे गडकोट किल्ले मोहीमा आयोजित करणे काळाची गरज असून व्यसनमुक्त युवक संघ यासाठी कायम प्रयत्नवादी राहील असे प्रतिपादन संघाचे राज्याध्यक्ष शहाजी काळे यांनी केले आहे. एप्रिल २०२१ मध्ये किल्ले शिवनेरी ते रायगड अशी चौदा दिवसांची मोहीम राबविण्यात येणार असून असंख्य युवकांनी याची प्रेरणा घ्यावी असे आवाहन शहाजी काळे यांनी केले आहे.