शिवयोगी नंदगिरी महाराज, सोळशी यांचे समाजहिताचे प्रवचन 27 नोव्हेंबर 2021
श्री क्षेत्र यवतेश्वर मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमा उत्साहात साजरी...
सामाजिक वनीकरण विभाग सातारा यांच्या पुढाकाराने शनैश्वर देवस्थान सोळशी वृक्ष वाटप कार्यक्रम संपन्न
पाटण तालुक्यातील ठोमसे येथे सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये वसलेले श्री त्र्यंबकेश्वराचे देवस्थान
.jpg)
पाटण तालुक्यातील ठोमसे येथील सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये वसलेल्या श्री त्र्यंबकेश्वराचे देवस्थान हे नाशिक येथील दुसरे स्थान मानले जाते पुरातन काळापासून याठिकाणी स्वयभू पिंडिचे शिल्प आहे त्या काळी भक्ताना दिसल्यावर त्याठिकाणी नाशिक येथील पिंडिची हुबेहूब शिल्प पाशानात असल्याचे आढळले त्यामुळे यावरुन या देवस्थानाला श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर असे नाव पडले या मंदिराच्या पाठीमागे भागीर्थी नावाचे थंड पाण्याचे कुंड आहे . हे पाणी १२ महिने २४ तास थंड राहते या पाण्याने स्नान केल्यास पुण्य लाभते . तर तेथील पिंपळाच्या झाडाखाली जगदणी माताचे स्थान आहे उब्रज पाटण महामार्गावरून पश्चिम बाजुस डोगर कपारातुन सवत कडा परिसरात फेसळणारा धबधबा दिसतो सध्या पाऊसामुळे येथील डोंगरावर हिरवी चादर पांगरल्याचे नयनरम्य दृष्य दिसते आजु बाजुला वाढलेली घनदाट झाडी यामुळे येथील परिसर मन प्रसन्न करुन टाकतो या धबधब्या पर्यंत जाण्यास घनदाट झाडीतुन जावे लागते .या त्र्यंबकेश्वर पर्यंत जाण्यासाठी ठोमसे येथुन जाता येते मात्र तेथुन पुढे पायवाटेने जावे लागते तर दुसरा रस्ता ताबेवाडी मार्ग देवस्थान पर्यंत कच्चा रस्ता गणेवाडी ग्रामस्थानी केला आहे . श्रावण महिण्याच्या तिसऱ्या सोमवारी याठिकाणी भाविकांची गर्दी असते निसर्गाच्या सानिध्यात असलेलं हे स्थान आजही सोईसुविधाशिवाय दुर्लक्षीत आहे गेल्या कित्येक वर्षापासून या मंदिराचा जीर्णोद्धार झाला नाही पाटण तालुक्यातील हे स्थान सध्या येथे येणाऱ्या भाविक पर्यटकांसाठी परवणीच आहे