कराडजवळ पुणे-बंगळुरू महामार्गावरील भीषण अपघातात चार ठार

ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दोन चारचाकी गाड्यांमध्ये झालेल्या अपघातात ४ ठार तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. पुणे-बंगळुर महामार्गावर कराड तालुक्यातील नारायणवाडी गावच्या हद्दीत अटके टप्प्याजवळ रविवार (दि. ३१) सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघात एवढा भीषण होता की, दोन्ही गाड्या रस्त्याकडेच्या नाल्यातून बाजूच्या झाडांवर जावून आदळल्या. अपघातातील सर्वजण पुणे येथील असल्याचे समजते. याबाबत घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी की, पुणे-बंगळूर महामार्गावर कोल्हापूरहून पुण्याकडे इनोव्हा कार व स्वीफ्ट कार निघाल्या होत्या. त्या दोन्ही गाड्या कराड तालुक्यातील नारायणवाडी गावच्या हद्दीत आल्यानंतर एकमेकांना ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात अटकेटप्पा येथे त्यांचा अपघात झाला. अपघातानंतर दोन्ही कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडावर जाऊन आदळल्या. अपघात झाल्याची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांसह हायवे हेल्पलाईनचे कर्मचारी त्वरीत घटनास्थळी दाखल झाले. तसेच तालुका पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहचले. त्यांनी नागरिकांच्या मदतीने अपघातातील जखमींना उपचारासाठी त्वरीत कराड येथील रुग्णालयात पाठविले. अपघात स्थळी दोन्ही गाड्यांच्या काचा पडल्या होत्या. तर मोठ्या प्रमाणावर वाहनांचे नुकसान झाले होते. जखमींना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यापैकी चौघांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सुत्रांनी सांगितले.अपघातातील सर्व जखमी पुणे व पुणे जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. घटनास्थळी रात्री उशीरा पर्यत पंचनामा करण्याचे काम सुरू होते.

सीरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीला भीषण आग

पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटच्या नव्या इमारतीमध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. ही आग इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर लागल्याचे समोर आले आहे. आगीच्या घटनास्थळी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, या आगीचे कारण अद्याप समोर आलेले नाही. कोव्हिशिल्ड लसीच्या वापरासाठी परवानगी देण्यात आलेली असून सध्या देशभरात लसीकरणास सुरु आहे. मांजरी येथील याच ठिकाणी लसीचं उत्पादन केलं जात होतं. ज्या इमारतीमध्ये आग लागली आहे तेथून जवळच प्रोडक्शन प्लांट आहे. आज दुपारी २ वाजता सीरम इंस्टीट्यूटच्या इमारतीला आग लागण्यची माहिती मिळत आहे. ही आग कोणत्या कारणामुळे लागली हे स्पष्ट नसले तरी कोरोना लसीकरणाचे मोहीम सुरु असतानाच ही घटना घडली. सिरम इन्स्टिट्यूटच्या नवीन बिल्डिंगला आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या दहा गाड्या दाखल झाल्या. या आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले आहे. या इमारतील कोरोना लस सुरक्षित आहे, अशी माहिती BCG ने दिली आहे. कोव्हिशील्ड लस सुरक्षित जिथे कोरोनाची लस बनवण्याचं काम होत आहे, ती जागा सुरक्षित आहे. या जागेच्या विरुद्ध बाजूला जे गेट आहे, तिथे ही आग लागल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे कोव्हिशिल्ड लसीला कोणताही धोका नाही. कोव्हिशिल्ड लसीचं काम हे गेट नंबर तीन, चार आणि पाच या परिसरात केले जाते. हा भाग अत्यंत सुरक्षित आहे. बीसीजी कोरोना लसीचे उत्पादनच्या इमारतीला आग घटनास्थळी आग्निशमनच्या दहा गाड्या दाखल कोरोनाची लस बनवण्याचे ठिकाण सुरक्षित कोव्हशिल्ड लसीचा साठा सुरक्षित संशोधकांना सुरक्षित स्थळी हलवलं इमारतीमधील ३ जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश, एकाला बाहेर काढण्याचा प्रयत्न इमारतीजवळ गर्दी करू नका- अग्निशमन दलाचे आवाहन आगी विझवण्यासाठी एक ते दिड तास लागणार – अग्निशमन दल जिथे लस निमिर्ती झाली तिथे फार नुकसान नाही – अग्निशमन दल


Copyright 2016 - DINAMAN

< script type="text/javascript" > < /script >