डीजी कॉलेज एनसीसी कॅडेट तेजस्वी पवारची पॅरामिलिटरी फोर्स मध्ये निवड

सातारा येथील धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय व 22 महाराष्ट्र बटालियन एनसीसी साताराची कॅडेट तेजस्वी पवार हिची भारतीय पॅरामिलिटरी फोर्स  मध्ये निवड झाली आहे. फेब्रुवारी 2018 मध्ये स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत पॅरामिलिटरी फोर्सेस अंतर्गत विविध दलासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये तेजस्वी पवार हिने यश संपादन केले आहे. ऑक्टोबर 2019 मध्ये ग्राउंड परीक्षा व जानेवारी 2020 मध्ये मेडिकल परीक्षा उत्तीर्ण होऊन तिची अंतिम निवड जानेवारी 2021 मध्ये आसाम रायफल्स या दलामध्ये झाली आहे. तिच्या या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ.अनिल पाटील, सचिव प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर, सहसचिव (उच्चशिक्षण) व महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती डॉ. प्रतिभा गायकवाड, उपप्राचार्य डॉ. एल. एन. घाटगे, एनसीसी ऑफिसर लेफ्टनंट डॉ. राजशेखर निल्लोलू, सर्व शिक्षक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी  तसेच २२ महाराष्ट्र बटालियन एनसीसी सातारा चे कमांडिंग ऑफिसर कर्नल बी.एस.काशीद, ऍडमिन ऑफिसर कर्नल पराग गुप्ते, सुभेदार मेजर उदय पवार व सर्व रँक्स व सिव्हिल स्टाफ सर्व स्तरावरून तिचे अभिनंदन व कौतुक होत आहे.

यवतेश्वर येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
साताऱ्यात पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते शासकीय झेंडावंदनाचा मुख्य कार्यक्रम उत्साहात संपन्न

राज्यासह देशभरात मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येत आहे. कोरोना पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करुन साताऱ्यातही प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सहकारमंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते शासकीय झेंडा वदंनाचा मुख्य कार्यक्रम शाहू स्टेडियम सातारा येथे पार पडला. यावेळी कोरोनाकाळात पोलिसांनी अत्यंत चांगली कामगिरी बजावली याबद्दल पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते पदक, प्रशस्तीपत्रक आणि पुष्पगुच्छ देऊन पोलिसांना सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर कोरोनाकाळत उत्तम कामगिरी बजावलेले कोरोना योद्धा, आशा सेविका, नगरपालिकेचे कर्मचारी, सिव्हील सर्जन यांना देखील गौरविण्यात आले. यावेळी सातारा जिल्हाचे जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलिस अधिक्षक अजयकुमार बन्सल, वनविभाग अधिकारी भगतसिंह डाहा. सातारा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुभाष चव्हाण आणि आजी-माजी सैनिक तसचं सातारकर नागरिक उपस्थित होते.

डी जी कॉलेज एनसीसी कॅडेट पूजा शिंदेची एअर फोर्स फ्लयिंग ऑफिसर पदी निवड

सातारा येथील धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयातील व २२ महाराष्ट्र बटालियन एनसीसी येथील कॅडेट पूजा आनंदराव शिंदे हिची भारतीय वायुसेनेमध्ये फ्लयिंग ऑफिसर पदी निवड झाली आहे. कॅडेट पूजा शिंदेने एअर फोर्स नॉन टेकनिकल ग्राउंड ड्युटी अकाउंट्स ब्रांच अंतर्गत फ्लयिंग ऑफिसर पदासाठी अर्ज केला होता. भारतीय वायुसेनेमार्फत फेब्रुवारी २०२० मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये तिने यश संपादन केले असून मार्च २०२० मध्ये सर्विस सिलेक्शन बोर्ड चे मुलाखत पूर्ण करून तिची अंतिम निवड डिसेंबर २०२० मध्ये झाली आहे. सैन्य दलातील महिला अधिकारी पदावर निवड झालेली महाविद्यालयातील व बटालियनमधील ती पहिलीच महिला कॅडेट आहे. तिच्या या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ.अनिल पाटील, सचिव प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर महाविद्यालयाच्या प्राचार्या व रयत शिक्षण संस्थेच्या सहसचिव श्रीमती डॉ. प्रतिभा गायकवाड, उपप्राचार्य डॉ. एल. एन. घाटगे, एनसीसी ऑफिसर लेफ्टनंट डॉ. राजशेखर निल्लोलू सर्व शिक्षक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी तसेच २२ महाराष्ट्र बटालियन एनसीसी सातारा चे कमांडिंग ऑफिसर कर्नल बी.एस.काशीद, ऍडमिन ऑफिसर कर्नल पराग गुप्ते, सुभेदार मेजर उदय पवार व सर्व रँक्स व सिव्हिल स्टाफ सर्व स्तरावरून तिचे अभिनंदन व कौतुक होत आहे.


Copyright 2016 - DINAMAN

< script type="text/javascript" > < /script >