आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त पोवई नाका शिवतीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला उद्या महाअभिषेक व हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी

- 2022-03-29
सातारा चे लोकप्रिय आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त पोवई नाका शिवतीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला उद्या दि.३० रोजी दुपारी ४ वाजता महाअभिषेक व हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात येणार असल्याची माहिती नगर विकास आघाडीचे पक्षप्रतोद नगरसेवक अमोल मोहिते यांनी दिली आहे. तसेच या कार्यक्रमाला सर्व सातारकरांनी उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे. सातारा जावळीचे आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा उद्या दिनांक 30 रोजी वाढदिवस असून त्यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात व तालुक्यात ठीक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शिवेंद्रराजे यांच्या वाढदिवसानिमित्त राजवाडा येथे सकाळी महायज्ञ तसेच गोडोली येथे १२ वाजता महा रक्तदान शिबिर व पोवई नाक्यावरील शिवतीर्थ येथे दुपारी ४ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक तसेच पंचगंगेच्या जलानी महाभिषेक करण्यात येणार आहे. तसेच हेलिकॉप्टरद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन नगरविकास आघाडीचे पक्षप्रतोद नगरसेवक अमोल मोहिते यांनी केले असून या कार्यक्रमाला सर्व सातारकरांनी उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.