वर्ल्ड ग्रेटेस्ट रेकाॅर्ड कडून डाॅ.संदीप डाकवे यांच्या नावाची दखल
  • 2022-03-29

युवा चित्रकार डाॅ.संदीप डाकवे आणि वेगळा कलात्मक उपक्रम हे जणू समीकरणच झाले आहे. सातत्याने हटके कलात्मक उपक्रम राबवून डाॅ.डाकवे यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. 12 डिसेंबर रोजी राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा.शरद पवार यांचा 81 वा वाढदिवस होता. त्यावेळी त्यांना 81 पोस्टकार्ड ची शुभेच्छा पत्रे डाॅ.डाकवे यांनी पाठवली होती. प्रत्येक पोस्टकार्डवर त्यांचा दर्शविणाऱ्या शब्दाची कॅलिग्राफी केली होती. या अनोख्या उपक्रमाची नोंद वर्ल्ड ग्रेटेस्ट रेकाॅर्ड या पुस्तकात होणार असल्याचा मेल डाॅ.संदीप डाकवे यांना प्राप्त झाला आहे. काही दिवसातच त्याचे सर्टीफिकेट आणि मेडल त्यांना मिळणार आहे. वर्ल्ड ग्रेटेस्ट रेकाॅर्ड या पुस्तकात डाॅ.संदीप डाकवे यांची दखल घेतल्याने त्यांच्या कलात्मक उपक्रमाला ‘चार चाॅंद’ लाभले आहेत. सध्याच्या सोशल मिडीयाच्या युगात वाढदिवसाला वयाइतकी पोस्टकार्ड पाठवून शुभेच्छा हा हटके कलाप्रकार असल्याने त्याची दखल घेतली आहे. दरम्यान, डाॅ.शरद पवार यांना पाठवलेल्या पत्रांची दखल विविध वृत्तमानपत्रे आणि टीव्ही 9 मराठी या वाहिनीने घेतली होती. वैविध्यपूर्ण कलात्मक उपक्रम राबवल्यामुळे डाॅ.संदीप डाकवे यांच्या नावाची नोंद यापूर्वी इंडिया बुक ऑफ रेकाॅर्ड मध्ये तीनदा, हायरेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्ड या विविध विक्रमांची दखल घेणाऱ्या पुस्तकांमध्ये झाली आहे. कला जोपासत असताना डाॅ.डाकवे यांनी स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम राबवत आपली कर्तव्यमुद्रा समाजमनावर उमटवली आहे. डाॅ.संदीप डाकवे यांच्या कलात्मक उपक्रमाची दखल वर्ल्ड ग्रेटेस्ट रेकाॅर्ड या पुस्तकाने घेतल्याने विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.