सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातील नाईक बाळकृष्ण हाटकर यांना ह्रदय ‍‍‌‌निरोप समारंभ, सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा भेटवस्तू देवून केला सत्कार
  • 2021-12-03

सातारा - सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात नाईक म्हणुन काम करत असलेले बी.आर. उर्फ बाळकृष्ण रामचंद्र हटकर हे पंचवीस वर्षांच्या सेवेनंतर सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन सपत्निक सत्कार करण्यात आला व त्यांचा निरोप समारंभ करण्यात आला. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हाधिकारी दालन,महसूल उपजिल्हाधिकारी निवडणूक शाखा येथे बाळकृष्ण हाटकर यांनी शिपाई पदापासून नाईक पदापर्यंत प्रामाणिकपणे काम केले आहे. अनिल डिग्गिकर , ओ.पी. गुप्ता आणि सुबराव पाटील हे जिल्हाधिकारी असताना त्यांच्या दालनात नाईक म्हणुन हाटकर यांनी काम पाहिले आहे. निरोप समारंभावेळी महसूल उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटे , नायब तहसीलदार शारदा खाडे , अव्वल कारकून जयंत वीर तसेच बाळकृष्ण हाटकर यांच्या पत्नी कांचन हाटकर उपस्थित होते. नागेश हाटकर यांना जिल्हाधिकारी शेखर सिंह , निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे , सेवानिवृत्त स्विय सहाय्यक प्रदिप बडवे यांनीही शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे हाटकर यांचे थोरले चिरंजीव कपिल हे गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा येथे तहसिलदार आहेत तर धाकटे चिरंजीव केतन नागपूर येथे मेट्रो रेल्वेमध्ये अभियंता म्हणून काम करत आहेत.